Belagavi

फेसबुक फ्रेंड्स सर्कलने २ निराधार व्यक्तींना केले इस्पितळात दाखल

Share

बेळगावातील दोघा निराश्रितांना फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा सरकारी इस्पितळात उपचारांसाठी पाठवून देऊन मानवसेवा केली

होय, बेळगावातील गोवावेसमधील एलआयसी ऑफिसजवळ सुमारे 50 वर्षे वयाची एक अगतिक महिला दयनीय स्थितीत झोपली होती. हे पाहून फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर, समाजसेवक अवधूत तुडवेकर यांनी डीसीपी रवींद्र गडादी यांना फोन करून त्या निराधार महिलेला जिल्हा इस्पितळात पाठवण्यासाठी पोलिसांची मदत मागितली. डीसीपी रवींद्र गडादी यांनी याबाबत टिळकवाडी पोलिसांना फोन करून सहाय्य करण्याची सूचना केली. त्यानुसार टिळकवाडी पोलिसांनी त्या महिलेला ऍम्ब्युलन्समधून बीम्स इस्पितळात उपचारांसाठी दाखल केले. याचप्रमाणे बॉंक्साईट रोडवरील श्री साई मंदिराजवळील कचराकुंडाजवळ सुमारे 45 वर्षे वयाचा एक निराधार व्यक्ती बसून असल्याचे दिसले. त्यावेळी तेथून जाणाऱ्या फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या कार्यकर्त्यांनी त्या निराधार व्यक्तीला बीम्स इस्पितळात दाखल केले. या कामासाठी सहकार्य केलेले डीसीपी रवींद्र गडादी,  टिळकवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच विनायक कांबळे, विठ्ठल सांबरेकर यांचे फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या कार्यकर्त्यांनी आभार मानले आहेत.

 

Tags: