Belagavi

माहेश्वरी अंधशाळेतील मुलांना स्मार्ट स्टीक, श्रवणोपयोगी उपकरणे

Share

 व्हॉईस ऑफ स्पेशली एबल्ड पीपल अर्थात वोसॅप संस्थेतर्फे मंगळवारी बेळगावातील माहेश्वरी अंधशाळेतील मुलांना स्मार्ट स्टीक आणि श्रवणोपयोगी उपकरणे वाटण्यात आली.

होय, बेळगाव शहरातील माहेश्वरी अंधशाळेतील 54 मुलांना वोसॅप ग्रुपचे संस्थापक प्रणय देसाई आणि सहकाऱ्यांच्या वतीने स्मार्ट स्टीक आणि श्रवणोपयोगी उपकरणांचे वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. प्रणय देसाई हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे रहात असून त्यांनी स्थापन केलेल्या वोसॅप ग्रुपचे 11 हजार सदस्य आहेत. या ग्रुपच्या वतीने आज अंध विध्यार्थ्यांना मोफत स्मार्ट स्टीक आणि श्रवणोपयोगी उपकरणे वाटण्यात आली.

यावेळी बोलताना वोसॅप ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, प्रणय देसाई यांच्या नेतृत्वाखाली आमचा 11 हजार सदस्यांचा वोसॅप ग्रुप आहे. आम्ही सगळे मिळून आपल्यापरीने समाजसेवा म्हणून हे काम करतो. आज माहेश्वरी अंधशाळेच्या 54 मुलांना मोफत स्मार्ट स्टीक आणि श्रवणोपयोगी उपकरणे दिली आहेत. आमच्या या ग्रुपतर्फे केवळ भारतातच नव्हे तर अन्य देशातील गरजुंनाही अशी मदत करण्यात येत आहे. बाईट

यावेळी बोलताना माहेश्वरी अंधशाळेचे शिक्षक म्हणाले, प्रणय देसाई यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा संपूर्ण ग्रुप चांगली सामाजिक कामे करीत आहे. विशेष मुलांना दैनंदिन गरजेच्या वस्तू, साहित्य ते पुरवत आहेत. आम्ही सगळ्याई त्यांच्या या विधायक कार्यात सहभागी झाले पाहिजे असे सांगितले. बाईट

यावेळी विजय चौगुले, शशिधर मिटगार, नियती शहा, राघवेंद्र अणवेकर, गिरीश सव्वाशेरी आदी उपस्थित होते.

 

 

 

Tags: