Chikkodi

चिक्कोडी शहरात बर्निंग डंपरचा थरार !

Share

चिक्कोडी शहरात आज नागरिकांना बर्निंग डंपरचा थरार पहायला मिळाला. शहरातील बसवेश्वर चौकात    अचानक डंपरला आग लागल्याची घटना घडली. नागरिकांनी आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग विझविली.

नागरमुन्नोळीहून येणाऱ्या डंपरला चिक्कोडीतील बसवेश्वर चौकात येताच अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने खाली उतरून नागरिकांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न सुरु केला. तोवर अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग पूर्णतः विझविली. संजू चन्ननावर यांचा मालकीचा हा डंपर आहे.

 

 

Tags: