Hukkeri

*हुक्केरी येथे योग्य शिबिराची सांगता *

Share

हुक्केरी परिसरातील विजय रवदी फार्म हाऊसमध्ये पतंजली योग समिती हुक्केरी तसेच विजय रवदी समाज सेवा संस्था तसेच रयत हितरक्षण वेदिका हुक्केरी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त योग वार्षिकोत्सव शिबिराचा सांगता समारंभ आयोजित करण्यात आला होता.

: या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर पी जी कोण्णूर,, शिवानंद झुर्ली सोलापूर, संजू मुतालिक, बसवराज कुंभार, राजू बागलकोटी आदी मान्यवर उपस्थित होते. योगगुरु कुमार बडिगेर यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर चंद्रशेखर गंगनावर यांनी प्रास्ताविक केले. उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी या कार्यक्रमात बोलताना उषा रवदी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. योगाभ्यासामुळे आपले आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहण्यास मदत होते यामुळे महिलांनी योग शिबिरात अवश्य सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले

विजय रवदी यांनी आपलेमनोगत व्यक्त करताना सांगितले कि, गेल्या १ वर्षांपूर्वी केवळ १५ दिवसांपुरे मर्यादित योग शिबीर आयोजित करण्याचे ठरले होते. मात्र योगा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा वाढत प्रतिसाद आणि शिबीर वाढविण्याची मागणी यामुळे पुन्हा हे शिबीर वाढविण्यात आले. या शिबिरात पुरुषांसह अनेक महिलाही सहभागी होत असून योगामुळे शरीर निरोगी आणि सुदृढ राहण्यास मदत होते असे ते म्हणाले.

यावेळी अन्नपूर्णाया, उमा दद्दीमनी, कुंवार, संदीप सूर्यवंशी, महादेव दद्दीमनी यासह अनेक प्रशिक्षणार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी योगगुरू बी एन कोळेकर, सुनील बोंगाळे, राजू गस्ती, ज्योती सोलापुरे, अरुणा इंगळे, रत्ना गस्ती आदी उपस्थित होते.

Tags: