Belagavi

बेळगावात चिक्कबस्तीचा शतमानोत्सव; १ हत्ती, ५६ घोड्यांसह भव्य रथोत्सव 

Share

 बेळगावातील मठ गल्लीतील श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर चिक्कबस्तीला 109 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गेले तीन दिवस विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते.  

होय, बेळगावातील मठ गल्लीतील श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर चिक्कबस्तीला 109 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गेले तीन दिवस विविध धार्मिक विधी करण्यात आले. रविवारी सर्वदोष प्रायश्चित विधी पार पडला.   त्यानंतर सायंकाळी 5 वाजता रथोत्सव आयोजित करण्यात आला. या रथोत्सवात एका हत्तीसह 56 घोड्यांचा सहभाग होता. या भव्य रथोत्सवात बेळगावातील समस्त दिगंबर जैन समाजाच्या शेकडो श्रावक-श्राविकांनी श्रद्धेने सहभाग घेतला. आ. अनिल बेनके यांनी या रथोत्सवाचे उदघाटन केले. सायंकाळी 6 वाजता चिक्कबस्तीपासून सुरु झालेली ही रथोत्सव मिरवणूक कलमठ रोड, रविवार पेठ, देशपांडे गल्ली, बसवण गल्ली, रामलिंग खिंड गल्ली, टिळक चौक, अनंतशयन गल्ली, कुलकर्णी गल्ली, शेरी गल्ली मार्गे पुन्हा मठ गल्लीतील चिक्कबस्तीजवळ येऊन समाप्त झाली.

ही रथोत्सव मिरवणूक यशस्वी होण्यासाठी जैन युवक मंडळाचे सदस्य, आराधना महिला दलाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. विशारद नृत्य संस्थेच्या विद्यार्थिनींनी सुंदर पालखी सजवून मिरवणुकीची शोभा वाढवली. या मिरवणुकीत भरतेश शिक्षण संस्थेचे विनोद दोड्डण्णावर, ट्रस्ट कमिटीचे अप्पासाहेब चौगुले, रतन रामगौंड, अर्जुन चौगुले, प्रकाश चौगुले, हिराचंद कलमनी, सुधीर चौगुले, राजेश कलमनी, अजित चौगुले, किरण कलकुप्पी, भरत करेन्नावर, अरुण बेल्लद, माजी नगरसेवक पद्मराज वैजन्नावर आदी सहभागी झाले होते.

 

 

 

Tags: