Hukkeri

केस्ती महालक्ष्मी यात्रेत रमेश कत्ती यांनी घेतले देवीचे दर्शन

Share

हुक्केरी तालुक्यातील केस्ती गावची ग्रामदेवता लक्ष्मीदेवी यात्रेनिमित्त बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माजी खा. रमेश कत्ती यांनी गावाला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना रमेश कट्टी म्हणाले, भारतात हजारो वर्षांपासून महिलांना देवीचा दर्जा देऊन सन्मान देण्यात येतो. त्यामुळे सर्वांनी महिलांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हायला पाहिजे. तरच लक्ष्मीदेवीची खऱ्या अर्थाने आपल्याला आशीर्वाद लाभेल. महिलांप्रती सन्मानाची वागणूक देण्याचा संदेश मिळावा यासाठीच लसखमीदेवीची यात्रा भरविण्यात येते असे त्यांनी सांगितले.

यावेळी केस्ती गावातील स्थानिक नेते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: