विध्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वाचा टप्पा असलेल्या एसएसएलसी परीक्षेला उद्या राज्यभरात प्रारंभ होत आहे. 11 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या परीक्षेची विजापूर जिल्ह्यात सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

विजापूर जिल्हा प्रशासनाने उद्यापासून सुरु होणाऱ्या दहावी परीक्षेची सर्व तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यात 20,136 विध्यार्थी आणि 18,679 विद्यार्थिनी मिळून एकूण 38,813 परीक्षार्थी एसएसएलसी परीक्षा देणार आहेत. त्यासाठी जिल्हाभरात 147 परीक्षा केंदे स्थापन करण्यात आली आहेत. विध्यार्थ्यांना माहिती मिल्ने सोपे व्हावे यासाठी परीक्षा केंद्रांवर फलकांवर विद्यार्थ्यांचे आसन क्रमांक, परीक्षा खोली आदी माहिती लिहिण्यात रविवारी परीक्षा केंद्रांचे कर्मचारी व्यग्र होते. रवींद्रनाथ टागोर हायस्कूल, व्ही. बी. बिरादार, पिडिजे, एक्सलंट या खासगी तसेच सरकारी शाळांमध्ये परीक्षा केंद्रे असून तेथे सर्व पूर्वतयारी करण्यात आली. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व केंद्रांच्या 200 मीटर परिसरात 144 कलम लागू करण्यात आले आहे.


Recent Comments