बेळगावातील मठ गल्लीतील श्री पार्श्वनाथ दिगंबर जणी मंदिर चिक्कबस्तीच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 25 ते 27 मार्च या काळात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

होय, बेळगावातील मठ गल्लीतील श्री पार्श्वनाथ दिगंबर जणी मंदिर चिक्कबस्तीच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त चिक्कबस्तीमध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून एखाद्या सणासारखे वातावरण निर्माण झाले आहे. 25 ते 27 मार्च या काळात णमोकार विधान, भगवान बाहुबलीचा अभिषेक, रथोत्सव आदी धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्याचप्रमाणे शुक्रवारी सायंकाळी येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. त्यात लहान मुलांनी तसेच आराधना महिला मंडळाच्या सदस्यांनी उत्साहाने भाग घेऊन आनंद लुटला. 
याचप्रमाणे आज सायंकाळी आणि उद्याही विविध कार्यक्रम होणार आहेत असे आयोजकांनी कळविले आहे.


Recent Comments