Belagavi

सिध्दरामयांच्या ‘त्या’ वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध सिध्दरामय्यांनी स्वामीजींची जाहीरपणे माफी मागावी रंभापुरी श्रींचा आग्रह

Share

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्वामींच्या पोशाखावर केलेल्या वादग्रस्त विधानावर अनेक स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत असून सिध्दरामय्यांनी केलेल्या विधानाबद्दल जाहीरपणे माफी मागावी असा आग्रह रंभापुरी जगद्गुरू श्रींनी केलाय.

हिजाब प्रकरणी बोलताना माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्वामींच्या पोशाखावर वादग्रस्त विधान केले. या विधानानंतर सिध्दरामय्यांवर निषेधाचा सूर उमटण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर रंभापुरी जगद्गुरूंनी देखील निषेध नोंदविला असून सिध्दरामय्यांनी आपल्या विधानाबाबत जाहीरपणे माफी मागावी अशी मागणी केली आहे.

सिध्दरामय्यांनी हिंदू धर्मविरोधात चुकीची वक्तव्ये केली आहेत. अशापद्धतीची वक्तव्ये त्यांनी अनेकवेळा केली असून सिध्दरामय्यांना हे वागणे शोभत नसल्याचेही जगद्गुरू श्रींनी म्हटले आहे. हिजाब प्रकरणी प्रतिक्रिया देताना त्यांनी अनेक चुकीची वक्तव्ये केली आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांनी शाळा – महाविद्यालयात समवस्त्र परिधान करणे आवश्यक असून या निकालानंतर स्वामींच्या फेट्यावर अवमानकारक वक्तव्य सिध्दरामय्यांनी केले आहे. फेटा बांधूनच अनेकांनी मोठी साधना केली आहे. सिध्दरामय्यांचे हे विधान केवळ स्वामिंचेच नाही तर हिंदू धर्माचेही अवमान करणारे असून आपण त्याचा निषेध करत असल्याचे जगद्गुरू म्हणाले. ()

यासंदर्भात पुढे बोलताना वीरशैव लिंगायत समाजाच्या नावावर धर्मविरोधी वक्तव्ये करणाऱ्या सिध्दरामय्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचेही मत रंभापुरी जगद्गुरूंनी व्यक्त केले. सदर वक्तव्यांवर सिध्दरामय्यांनी जाहीरपणे माफी मागावी असा आग्रह जगद्गुरूंनी केला आहे. ()

माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्यांनी केलेल्या विधानावर आता विविध स्तरावरून विरोध व्यक्त होत आहे. राजकारणात नेहमीच एकमेकांवर टीका टिप्पण्या करण्यात येतात. मात्र धर्मविरोधी विधाने न करता केवळ राजकारणापुरती मर्यादित टीका टिप्पणी करावी, स्वार्थासाठी आणि राजकारणासाठी धर्माचा वापर करून वातावरण बिघडवू नये अशी प्रतिक्रियाही अनेक स्तरावर व्यक्त होत आहे. सिध्दरामय्यांवर होत असलेल्या निषेधांवर आता सिद्धरामय्या कोणते पाऊल उचलणार हे मात्र पाहावे लागेल.

Tags: