भाजप ग्रामीण मंडळाच्यावतीने ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे प्रदर्शन मोफत ठेवण्यात आले होते. या चित्रपटाचा लाभ आज अनेक सिनेरसिकांना घेता आला आहे.

भाजप बेळगाव ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी प्रकाश थिएटर्स येथे ‘द काश्मिरी फाईल्स’ या चित्रपटाचे प्रदर्शन मोफत ठेवण्यात आले होते. रुद्रकेसरी मठाचे हरिगुरु महाराज, काडसिद्धेश्वर मठाचे कृपानंद स्वामीजी यांच्या उपस्थितीत शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी हा चित्रपट पाहिला.
यासंदर्भात हरिगुरु महाराज बोलताना म्हणाले, कृपानंद सवामीजींवर इतिहासात अनेक अत्याचार झाले आहेत. याबद्दल जनतेला माहिती नाही. याचप्रमाणे काश्मीरमध्ये झालेल्या काश्मिरी पंडितांवरील अत्याचारासंदर्भात देखील जनतेला माहिती नाही. हि माहिती या चित्रपटात देण्यात आली असून देशातील प्रत्येक नागरिकाने हा चित्रपट आवर्जून पाहावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी धनंजय जाधव बोलताना म्हणाले, आपल्या देशात पूर्वी हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार करण्यात आले. लाखोंनी आपले प्राण यात गमावले. आता यापुढे हिंदूंवरील अन्याय सहन करून घेतले जाणार नाहीत आणि यापुढे अन्याय होऊ देणार नाही, असे ते म्हणाले.
सुमारे ६०० हुन अधिक जणांनी आज हा चित्रपट पाहण्याचा लाभ घेतला असून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रियाही दिल्या.


Recent Comments