Belagavi

बेळगावात कर्तव्य महिला मंडळातर्फे महिलादिन

Share

देशात महिलांना देवतेचा सन्मान देण्यात येतो. मात्र आजही महिलांवरील अत्याचार कमी झाले नसून, महिलांनी संघटितपणे त्यांचा मुकाबला करण्याची गरज आहे असे मत हिंदू जनजागृती समितीच्या पदाधिकारी उज्ज्वला गावडे यांनी सांगितले.

बेळगावात कर्तव्य महिला मंडळातर्फे चव्हाट गल्लीतील जालगार मारुती मंदिरात जागतिक महिलादिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून एंजल फौंडेशनच्या संचालिका मीना बेनके उपस्थित होत्या. याप्रसंगी दहावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या विद्यार्थिनींचा मीना बेनके व उज्ज्वला गावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी आक्काताई सुतार, रेणुका पवार, मथुरा कुट्रे, सुनीता किल्लेकर, मिलन पवार, रुक्मिणी रेडेकर, शांत किल्लेकर यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

 

Tags: