बेळगावमधील राजकारणाचा एक महत्वाचा आणि प्रतिष्ठेचा भाग समजल्या जाणाऱ्या बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील एका जागेसाठी निवडणूक घेण्यात आली होती. हि निवडणूक मोठी चुरशीची ठरली असून कत्ती व्हर्सेस जारकीहोळी अशा रंगलेल्या सामन्यात कत्ती समर्थक संजू अवकणवर यांचा विजय झाला आहे.
शनिवारी पार पडलेल्या निवडणुकीत कत्ती समर्थकाने विजय मिळविला असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात पुन्हा जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली होती. जारकीहोळी आणि कत्ती यांच्यामध्ये रंगलेल्या सामन्यात अखेर कत्ती समर्थक उमेदवार संजू अवकणवर यांनी बाजी मारली. माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवडी, उमेश कत्ती, शशिकला जोल्ले तर दुसऱ्या बाजूला भालचंद्र जारकीहोळी, रमेश जारकीहोळी हे बंधू कंबर कसून होते. हि निवडणूक अत्यन्त चुरशीची ठरली आणि अखेर कत्ती समर्थक उमेदवाराची वर्णी लागली.
डीसीसी बँकेचे संचालक अशोक अवकणवर यांच्या निधनानंतर एक जागा रिक्त होती. बेळगाव जिल्ह्यातील दहा मार्केटिंग सोसायटींमधून एक सदस्य डीसीसी बँकेवर निवडून जातो. अशोक अवकणवर यांच्या मुलासह एकूण तीन उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. यामध्ये रामदुर्ग येथील फतेसिंह जगताप, मुनवळ्ळी येथील रवींद्र यलीगार आणि संजू अवकणवर यांचा समावेश होता. राजकारण्यांच्या प्रतिष्ठेचा विषय असणाऱ्या डीसीसी बँकेत रिक्त झालेल्या जागेवरील निवडणुकीसाठी दोन गटांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली. दोन्ही गटांनी मोठी कसरत केलेलेही पाहायला मिळाली
बिडीसीसी बँकेतील संचालक पदासाठी घेण्यात आलेली निवडणूक बँकेच्या पाचव्या मजल्यावर आयोजित करण्यात आली होती. या निवडणुकीत भाजप नेते अरविंद पाटील यांच्यासह अनेक मतदारांनी मतदान केले. भाजप उपाध्यक्ष लक्ष्मण सवदी यांच्यासह संजू अवकणवर आणि इतर ६ जणांनी यावेळी मतदान केले. जगदीश कवटगीमठ (चिकोडी), पवन कत्ती (संकेश्वर) संजू अवकणवर (अथणी) पी एच पाटील (खानापूर) शिवराज बसगुंडी (रायबाग) धोळप्पा इटगी (बैलहोंगल) या साऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यासह केएमएफ अध्यक्ष भालचंद्र जारकीहोळी हेही उपस्थित होते.
यावेळी पवन कत्ती यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले, आमच्या नेत्यांनी कोणाला पाठिंबा द्यायचा याबद्दल सूचना दिल्या आहेत. आमचे उमेदवार संजू अवकणवर यांना पाठिंबा देण्याचे वरिष्ठ नेत्यांनी सांगितले आहे. बेळगाव जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात कोणतीही दुफळी नाही. सर्व भाजप नेतेच आहेत. शिवाय राजकारण आणि सहकार क्षेत्र या दोन विविध गोष्टी असून याची तुलना होऊ शकत नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.
यासंदर्भात भाजप उमेदवार संजू अवकणवर म्हणाले, मला पाठिंबा देण्यात येईल असे नेत्यांनी सांगितले होते. याचप्रमाणे भाजप नेत्यांनी मला पाठिंबा दिला. आम्ही ६ जणांनी मतदानाचा हक्क बजाविला असून हि निवडणूक राजकीय नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
सायंकाळी निवडणूक संपण्यावेळी निवडणूक अधिकारी ए सी कर्लिंगणावर यांनी मतमोजणीला प्रारंभ करण्याचा आदेश दिला. मतमोजणीनंतर अधिकाऱ्यांनी विजेत्या उमेदवाराचे नाव घोषित केले. संजू अवकनवर यांच्या विजयाच्या घोषणेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
निवडणूक अधिकारी ए सी करलिंगनवर यांनी निकाल जाहीर केला. जिल्ह्यातील एकूण १० पैकी ६ टिएपीएमएस सदस्यांनी संजू अवकणवर यांना मतदान केले. तर फतेहसिंग जगताप यांना ४ सदस्यांनी मतदान केले. सर्वाधिक मते पटकावून संजू अवकणकर यांनी बाजी मारल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी घोषित केले. ()


Recent Comments