हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी गावात आज जंगली हत्तींनी दर्शन दिले. मात्र त्यांच्या वावराने ग्रामस्थांच्यात धडकी भरली आहे.

होय, हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी गावात शनिवारी अन्नाच्या शोधात जंगल भाग सोडून हत्ती आल्याने एकच खळबळ माजली. नर जातीचा हा हत्ती अन्नाच्या शोधात जंगल सोडून नागरी वस्तीकडे वळल्याचे स्पष्ट झाले. मात्र हत्तीच्या गावात अचानक आगमनाने ग्रामस्थांच्या भीती पसरली. शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या उसाच्या फडात जाऊन हत्तीने उसाचा फडशा पाडला. त्यानंतर मलप्रभा नदीच्या दिशेने हा हत्ती निघून गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. काही ग्रामस्थांनी या हत्तीच्या मौजमस्तीचे मोबाईलमध्ये चित्रीकरणही केले.


Recent Comments