बेड जंगम समाज हा अनुसूचित जातींमधील १०१ यादीतील १९ व्य क्रमात येतो. या समाजाला अनुसूचित जाती प्रमाणपत्र मिळावे यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळापासून आंदोलन करण्यात येत आहे. यासंदर्भात आमदार पी राजीव यांनी बेड जंगम समाजासंदर्भात आक्षेप व्यक्त केला असून त्यांच्या या भूमिकेचा निषेध बेड जंगम समाजातर्फे करण्यात येत आहे.
शनिवारी बेळगावमधील कन्नड साहित्य भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदे अखिल कर्नाटक बेड जंगम संघटनेचे विभागीय संचालक वीरुपाक्षप्पा नेरगलमठ यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बी डी हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन वर्षांपासून आंदोलन करण्यात येत असून बेड जंगम समाजाला अनुसूचित जातींचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कर्नाटक उच्च न्यायायालयातून अनेक आदेश देण्यात आले आहेत. कर्नाटक गॅझेटमध्ये अहवालालानुसार सूर्यनाथ कामात अहवालाचा तपशील देण्यात आला आहे. राज्यभरात ग्रेड २ तहसीलदार मात्र जात प्रमाणपत्र देण्यास नकार देत असून यासंदर्भात अनेकवेळा निवेदने देऊनही प्रतिसाद देण्यात येत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. ()
यानंतर अ. क. डॉ. आंबेडकर बेड जंगम समाज अनुसूचित जाती रक्षण वेदिकेचे जिल्हाध्यक्ष बसलिंगय्या चिक्कमठ यांनी बोलताना सांगितले, स्वातंत्र्यपूर्व काळापासून बेड जंगम समाजाला एक विशिष्ट महत्व आहे. राजा महाराजांच्या काळात आपल्या समाजबांधवांना विविध रत्ने देण्यात येत असत. प्रत्येक वर्षी धार्मिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येतात. याचप्रमाणे घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांनीही १०१ जात यादीत १९ व्या क्रमांकावर आपल्याला स्थान दिले आहे. परंतु हि सर्व वस्तुस्थिती पाहूनही आमदार जाणीवपूर्वक जंगम समाजाला लक्ष्य केले आहे. सभागृहात कोणताही मुद्दा उपस्थित करताना पुरावे हाताशी धरून मुद्दे उपस्थित करणे गरजेचे आहे. हे शक्य नसेल तर जाहीर व्यासपीठावर आपल्याला चर्चेला बोलवावे असे आव्हान देखील चिक्कमठ यांनी दिले.
या पत्रकार परिषदेला बेड जंगम समाजातील अनेक नेते आणि मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments