बेळगाव एज्युकेशन सोसायटी संचलित मॉडेल सायन्स अँड कॉमर्स इंटिग्रेटेड पियू कॉलेज आणि अर्थ कोटा करियर अकॅडमी मधील पीयूसी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आणि वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवारी पार पडले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावचे एसीपी एन. एस . बरमनी उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुनील काकतकर , संचालक अमित यादव, अमित मिठारे, बि.के . मॉडेल इंग्रजी स्कूलच्या प्राचार्य डॉ. सुचेता कुलकर्णी, तसेच बि.के मॉडेल हायस्कूलच्या एनसीसीचे प्रमुख रवी घाडगे उपस्थित होते.
पाहुण्यांचा परिचय सुनील काकतकर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन दिव्या हंचते श्रीहरी सदलगे यांनी केले आभार प्रदर्शन सुहासिनी जडीगर हिने केल. यावेळी राज्यातील सर्वोत्कृष्ट एनसीसी विभाग असा सन्मान बी के मॉडेल हायस्कूलला मिळाल्याबद्दल शाळेच्या एनसीसीचे प्रमुख रवी घाटगे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.


Recent Comments