Belagavi

इस्राएल धर्तीवर कागवाड तालुक्याच्या विकासाचे ध्येय-आमदार श्रीमंत पाटील

Share

जर्मन आणि इस्राएल देशाच्या धर्तीवर कागवाड तालुक्यातील कागवाड, शेडबाळ, ऐनापूर नगरपंचायत आणि उगार नगरपालिका व्याप्तीतील जनतेला स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी १३० कोटी रुपयांच्या खर्चातून लवकरच योजना मंजूर करून घेण्यात येईल, अशी माहिती माजी मंत्री आणि कागवाड मतदार संघाचे आमदार श्रीमंत पाटील यांनी दिली.

शुक्रवारी उगार खुर्द नगरपालिका व्याप्तीतील १४ आणि १५ व्या वित्त योजनेतील ३.१५ कोटी रुपयांच्या खर्चातून करण्यात येत असलेल्या विविध विकासकामांना त्यांनी चालना दिली.

यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले कि उगार खुर्द परिसरात २५ हजार च्या आसपास लोकसंख्या आहे. हा परिसर मोठा असून या भागातील लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी पुरविणे आणि जनतेचे आरोग्य राखणे हे आपले कर्तव्य आहे. यासाठी उगार येथे शुद्धीकरण घटकचे नूतनीकरण करण्यात येत आहे. शहरातील सर्व प्रभागांमध्ये समान पाणी वितरणासाठी पाईपलाईन, यासह गटारी, रस्त्याचे डांबरीकरण अशी अनेक विकासकामे सुरु करण्यात येत आहेत. संबंधित योजनांसाठी नगरविकास मंत्री भैरती बसवराज आणि निगम अध्यक्ष राजू गौड यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्याधिकारी संतोष बबलादी, इंजिनियर सिद्राम चौगुला, नेते प्रफुल थोरसे, विजय थोरसे, सुभाष खुराडे, योगेश कुंभार, राकेश पाटील, रवी राजमाने, राजू पाटील, विनायक कामेरी, जत्राटे, सुजय फराकट्टे, सरोजिनी कित्तूर, कंत्राटदार गिरीश बुटाळे, एम एच नदाफ, सचिन साळवंके, विकास पांडरे, श्रीशैल पाटील आदी उपस्थित होते.

Tags: