विधिमंडळ अधिवेशनात सुरु असलेल्या सभागृहाच्या कामकाजादरम्यान आमदार राजगौड पाटील आणि आम. अंजली निंबाळकर यांनी विविध विषयांवर मुद्दे उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले.

आमदार राजगौड पाटील यांनी मातृपूर्ण योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या पोषक आहारात दिरंगाई होत असल्याबाबत सभागृहात मुद्दा उपस्थित केला. ()
या मुद्द्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मंत्री हालप्पा आचार यांनी सांगितले, मातृपूर्ण योजने अंतर्गत बाळंतिणीला देण्यात येणार अन्नपुरवठा कोविड पार्श्वभूमीवर बंद करण्यात आला असून आता तो पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. यादरम्यान प्रत्येक घरात रेशन देण्याचे कार्य हाती घेण्यात आले होते.
आता पुन्हा अंगणवाडी केंद्रांमध्ये सदर योजना सुरु करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी सभापतींनी हस्तक्षेप करत सदर मुद्द्यावर अधिकाऱ्यांना धारेवर धरले. गर्भवतींना देण्यात येणाऱ्या आहारासंदर्भात तपासणी करून सदर अहवाल सादर करावा, कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असा सज्जड दम सभापतींनी दिला.
याचदरम्यान खानापूर मतदार संघाच्या आमदार अंजली निंबाळकर यांनी अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून वितरित करण्यात येणाऱ्या रेषांमध्ये दिरंगाई होत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. शिवाय वितरणात असमानता असल्याचेही सांगितले.
यादरम्यान माजी सभापती रमेशकुमार यांनी अमानवी घटनांचा निषेध करत अधिकारात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करून सरकारने यासंदर्भात चिंतन करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
या मुद्द्यावरदेखील मंत्री हालप्पा आचार यांनी प्रत्त्युत्तर देत सदर समस्यांवर सरकारी पातळीवर चर्चा करून, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्याचे आश्वासन दिले. शिवाय कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.


Recent Comments