Belagavi

आरपीआय कार्यकारिणीची बेळगावात 17 एप्रिलला सभा

Share

 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राज्य कार्यकारिणीची सभा येत्या 17 एप्रिल रोजी बेळगावातील गांधी भवनात होणार असल्याची माहिती पक्षाचे राज्याध्यक्ष डॉ. एम. के वेंकटस्वामी यांनी दिली.

बेळगावातील प्रवासी मंदिरात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आरपीआयचे राज्याध्यक्ष डॉ. एम. के वेंकटस्वामी म्हणाले, राज्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची फेरबांधणी करण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी पक्ष जय्यत तयारी करत आहे. त्या संदर्भात तसेच उमेदवार निश्चितीबाबत पक्ष राज्य कार्यकारिणी सभेत चर्चा करून काही निर्णय घेण्यात येणार आहेत.

पत्रकार परिषदेला आशा ताशिलदार, श्रावण कांबळे, दिवाण बाबूसाहेब देसाई, मल्लिकार्जुन बिळार, अजित हरिजन आदी उपस्थित होते.

 

Tags: