बेळगावात वीर मदकरी गर्जना संघातर्फे आजाराने पीडित कृष्णप्पा सोनटक्की यांच्या कुटुंबाला शिधासामग्री देण्यात आली.

बेळगावातील शहापूर दाणे गल्लीतील वीर मदकरी गर्जना संघाच्या कार्यालयात रेणुका कृष्णप्पा सोनटक्की यांना धीर देऊन अन्नधान्य व अन्य साहित्य देण्यात आले. तांदूळ, जोंधळा, पोहे यासह विविध खादयसामग्री सोनटक्की कुटुंबाला देण्यात आली. फ्लो
यावेळी बोलताना संघाचे राज्याध्यक्ष आनंद रामा शिरूर यांनी सांगितले की, सोनटक्की कुटुंब अतिशय गरीब आहे. कृष्णप्पा सोनटक्की यांच्या आजारामुळे ते संकटात आहेत. त्यामुळे वीर मदकरी गर्जना संघातर्फे या कुटुंबाला मदत देण्यात आली आहे. इतरांनीही या कुटुंबाला मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी संघाचे उपाध्यक्ष विकास रामा शिरूर, महेश होसूर, विनायक भस्मे, विनायक गोल्लर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments