Belagavi

टिपू सुलतान नगर येथील गटारींची समस्या गंभीर

Share

बेळगाव तालुक्यातील मच्छेजवळील हुंचेनहट्टी रोड, टिपू सुलतान नगर येथील गटारींची समस्या गंभीर बनली आहे. मच्छे नगर पंचायतीने याकडे साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केले आहे

होय, टिपू सुलतान नगरातील हुंचेनहट्टी रोड येथील गटारीचे केवळ एका बाजूचे कामकाज पूर्ण करण्यात आले आहे. दुसऱ्या बाजूचे कामकाज अर्धवट स्थितीत आहे. शमा आदम शेख यांच्या घर क्र. 3003 समोर गटारीचे सांडपाणी येत असून अनेक घरांची हीच परिस्थिती आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गटारीच्या बाजूने झाडेझुडुपे वाढल्याने डास, कीटकांची पैदास वाढली आहे. त्याचा येथील रहिवाशांना त्रास होत आहे. गटारी तुंबल्यामुळे येथे डुकरांचा उपद्रव सुरु झाला असून त्यामुळे लहान मुले आणि वृद्धांना धोका निर्माण झाला आहे. येथे काही लोक जैन कॉलेजच्या बाजूला कचरा टाकत असतात.

हुंचेनहट्टी रोड येथील काही भाग मच्छे तर काही भाग पिरनवाडी नगरपंचायतीकडे येतो. त्यामुळे दोन्ही नगरपंचायतींच्या अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी करून ही समस्या कायमची सोडवावी अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

 

Tags: