गेल्या १० वर्षांपासून उत्तर कर्नाटाकात धर्मस्थळ ग्रामविकास योजना यशस्वीरीत्या कार्यरत आहे. सध्या चिकोडी तालुक्यात ३ हजार हून अधिक संघ यशस्वीरीत्या कार्यरत आहेत, अशी माहिती योजनाधिकारी बी राघवेंद्र यांनी दिली.

: चिकोडी तालुक्यातील येडूर या गावातील श्री काडसिद्वेश्वर कल्याण भवन येथे श्री धर्मस्थळ ग्रामविकास योजनेच्या अंकली विभागातील साधना समावेश कार्यक्रमात ते बोलत होते. या भागात संघटन व्हावे, महिलांना शैक्षणिक, बँकिंग व्यवहार समजावेत या उद्देशाने प्रत्येक गावात हे संघ स्थापन करण्यात येत असून आज चिकोडी तालुक्यात ३ हजार हून अधिक संघ यशस्वीरीत्या कार्यरत असल्याचे ते म्हणाले.
यानंतर शिवतेज फाउंडेशनचे अध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्य अजय सूर्यवंशी बोलताना म्हणाले, प्रत्येक कुटुंबातील महिलेला धर्मस्थळ संघ आधारस्तंभाप्रमाणे सहकार्य करत आहे. या संघाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सहायय दिले जात असून अर्थसाहाय्यासोबतच आत्मविश्वास वाढविण्याचे कार्यदेखील या संघाच्या माध्यमातून होत असल्याचे ते म्हणाले. ()
यानंतर ग्रामपंचायत उपाध्यक्ष राहुल देसाई बोलताना म्हणाले, धर्मस्थळ संघ केवळ महिलांना अर्थसहायय करत नसून शैक्षणिक,, सामाजिक, शेती, यासह अनेक विभागात उत्तम कार्य करण्यासाठी हा संघ सहायय करत असल्याचे ते म्हणाले. ()
यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष श्रीदेवी सुनील वराळे, माजी जिल्हा पंचायत सदस्या भारती पवार, माजी तालुका पंचायत सदस्या पांडुरंग कोळी, गावातील नेते संजय रुद्रगौडा पाटील, बी गुरुराज, सोमेश्वर कम्मार, जैनांम लाडखान, शानूर लाडखान, माधुरी कांबळे, गौरम्मा बडिगेर, संध्या स्वामी, मीनाक्षी बडिगेर, रुपाली वरात, मिनाज बागवान आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments