Belagavi

*कन्नड साहित्य भवन येथे दत्ती कार्यक्रमाचे आयोजन *

Share

बेळगाव शहरातील कन्नड साहित्य भवनात बुधवारी लेखिका संघाच्या वतीने दत्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दि. सावित्री बाबुराव शिवपूजी दत्ती कार्यक्रमात विशेष दाटती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

कन्नड साहित्य भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात यावेळी जिल्ह्यातील ८० वर्षांहून अधिक वयोगटातील आठ वरिष्ठ आरोग्य सहाय्यिकांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमात बोलताना पत्रकार मुरुगेश शिवपूजी म्हणाले, कोणत्याही मूलभूत सुविधा नसताना अनेक लोकांचे प्राण वाचविण्यासाठी आरोग्य सहाय्यिकांनी केलेले कार्य अभिमानास्पद आहे. त्यांनी केलेले कार्य हे कौतुकास्पद आहे. आईप्रमाणे त्यांनी अनेकांची आरोग्यसेवा केली आहे. सावित्री शिवपूजी यांच्या स्मरणार्थ जिल्ह्यातील ज्येष्ठ आरोग्य सहाय्यिकांचा त्यांच्या सेवेसाठी सन्मान करण्यात येत आहे. ()

या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी असलेल्या लेखिका संघाच्या अध्यक्षा डॉ. हेमवती सोनोळ्ळी म्हणाल्या, देवाची उपासना करण्यापेक्षा अशा पद्धतीने सेवा करणाऱ्या व्यक्तींची उपासना करणे हे केव्हाही श्रेष्ठ आहे. ()

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले कसाप जिल्हाध्यक्षा मंगला मेटगुड म्हणाल्या, दत्ती निधी देणे हे एक उत्तम काम आहे. अशा पद्धतीने सार्वजनिक पातळीवर हे कार्यक्रम आयोजित करणे गरजचे आहे. अशा पद्धतीने दत्ती निधी वाढू शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. ()

या कार्यक्रमास साहित्यिका निळगंगा चरंतीमठ, दीपिका, लेखिका संघाच्या सदस्यता सुनंदा हालभावी, महानंदा पारशेट्टी, शालिनी चिनीवाल, सुनीता नंदेंनावर, प्रभा पाटील यांनी काव्यगायन सादर केले. यावेळी लेखिका संघाच्या वतीने दत्ती निधी देणाऱ्या मुरुगेश शिवपूजी आणि संगीत शिवपूजी यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी साहित्यिका ज्योती बदामी, पत्रकार कीर्ती कासरगोड, विद्या हुंडेकर, लीला चौगुले, सुरेश ज्योती, ज्योती माळी, शिवानंद ताल्लुर, एम वाय मेनसीनकायी, श्रीरंग जोशी आदींसह अनेक साहित्यिक मान्यवर उपस्थित होते.

Tags: