मुस्लिमांची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही, ते गोहत्या, गोमांस भक्षण करत राहतील तोपर्यंत त्यांच्याशी व्यापार–वहिवाट बंदच राहील असा इशारा श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी दिला.

बेळगावात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रमोद मुतालिक म्हणाले, गेल्या दोन दिवसांत कर्नाटकात काही ठिकाणी मुस्लिमांवर आर्थिक बहिष्कार घालण्यात आला आहे. मुस्लिमांची मानसिकता बदलेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहणार आहे. मुस्लिमांचा फुटीरतावाद हा देशाला गंभीर धोका आहे. त्यामुळे हा बहिष्कार सुरूच राहील. देवस्थानात मुस्लिम समुदायाच्या व्यापाऱ्यांना व्यापार करू न देण्याच्या निर्णयाला श्रीराम सेनेचा पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले.
हिंदू कार्यकर्ते शिवू उप्पार आणि हर्ष यांच्या हत्या आणि गदग येथे हिंदू महिलेवर मुस्लिम युवकांनी प्राणघातक हल्ला केला आहे. मुस्लिमांची मानसिकता बदलेपर्यंत त्यांचे हे क्रौर्य सुरूच राहणारे आहे. गोहत्या बंदी असूनही मुस्लिम गोहत्या करीत आहेत, गोमांस भक्षण करीत आहेत. हे जोपर्यंत ते थांबवत नाहीत तोपर्यंत त्यांच्याशी कसलाही व्यापार-व्यवहार करू नये असे आवाहनही प्रमोद मुतालिक यांनी यावेळी केले.
हिजाबवरून न्यायालयात गेलेले मुस्लिम आता न्यायालयाचाच आदेश धुडकावत आहेत. मुस्लिम विद्यार्थिनी, पालक, मुस्लिम संघटनांनी न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान केला नाही. उर्मट भाषा करून उलट न्यायाधिशांनाच हत्येची धमकी देत आहेत. त्यांच्यात कसलीही नैतिकता नाही अशी टीका प्रमोद मुतालिक यांनी केली. सुप्रीम कोर्टाचा आदेश असूनही पहाटे ५ वाजता उठून भोंगे वाजवून लोकांना त्रास देत प्रार्थना करतात, ते थांबले पाहिजे. हा तालिबान, पाकिस्तान नाही. घटनेप्रमाणे वागले पाहिजे. देशात शेकडा ८० इतके हिंदू लोक आहेत. त्यांच्यात मुस्लिम जगताहेत हे त्यांनी विसरू नये असा इशारा त्यांनी दिला.
एकंदर, जोपर्यंत मुस्लिम आपली मानसिकता बदलत नाहीत तोपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील असा इशारा प्रमोद मुतालिक यांनी दिला आहे.


Recent Comments