Belagavi

चांगदेव उर्फ राजा बागसवार यात्रोत्सवानिमित्त दंडवत आणि सांगीतिक कार्यक्रम

Share

चांगदेव उर्फ राजा बागसवार यात्रोत्सवानिमित्त गुरुवारी रामतीर्थनगरात आज, गुरुवारी दंडवत आणि सांगीतिक कार्यक्रम पार पडले.

दरवर्षीप्रमाणे रामतीर्थनगरमधील चांगदेवनगर येथील चांगदेव उर्फ राजा बागसवार यात्रा महोत्सवानिमित्त भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक २१ ते २५ मार्च या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २१ रोजी चांगदेव पालखी श्रीसिद्धेश्वर देवस्थान भेटीला नेण्यात येऊन रात्री ९.३०वाजता श्रीगंध अभिषेक करण्यात आला. त्यानंतर रोज विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. आज, गुरुवारी  दंडवत आणि सांगीतिक कार्यक्रम आयोजित केले होते. सायंकाळी महाप्रसाद वाटप करण्यात आले. उद्या शुक्रवारी रथोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यानंतर सायंकाळी ६.४५वा भंडारा कार्यक्रम आयोजित केला आहे.

Tags: