१००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराच्या स्थापनेला १०९ वर्षे पूर्ण होत असून या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये तीन दिवस विशेष पूजाविधींचे आयोजन करण्यात आले आहे.

व्हॉइस : बेळगावमधील १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराच्या स्थापनेला १०९ वर्षे पूर्ण होत असून या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये तीन दिवस विशेष पूजाविधी तसेच शताब्दी महोत्सवाचे आचरण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. सदर महोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी पूर्वतयारी करण्यात येत आहे.
२५, २६ आणि २७ मार्च असे तीन दिवस आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी आज शहर उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके यांनी शहरातील चिक्कबस्ती येथे भेट देऊन पाहणी केली.
यावेळी चिक्कबस्ती ट्रस्ट कमिटीचे अण्णासाहेब कलमनी, अप्पासाहेब चौगुले, रत्न रामगोंडा, अर्जुन चौगुले, जैन युवा वेदिकेचे पदमराज वैजण्णावर, सुनील चौगुले आदी उपस्थित होते.


Recent Comments