दि काश्मीर फाइल्सपेक्षाही बेळगाव फाईल्सची जखम अधिक भयानक आहे असा संदेश देणारे व्यंगचित्र शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटरवर अपलोड केल्याने कन्नडिगांचा तिळपापड झाला आहे.

दि काश्मीर फाईल्स या हिंदी चित्रपटावरून देशात सध्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. भाजपने या चित्रपटाचे स्वागत केले आहे तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आदी विरोधी पक्षांनी या चित्रपटात सत्य लपविल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर एक व्यंगचित्र अपलोड करून महाराष्ट्र-कर्नाटकातील ६५ वर्षे जुन्या बेळगाव सीमाप्रश्नाच्या गांभीर्याकडे लक्ष वेधले आहे. काश्मीर फाइल्सपेक्षा बेळगाव फाईल्सची जखम अधिक भळभळणारी आहे.
सीमाभागातील मराठी भाषिकांवर वर्षानुवर्षे अन्याय, अत्याचार होत आहे. कर्नाटक सरकारच पोलिसांकरवी हा अत्याचार करत आहे असा संदेश या व्यंगचित्रातून दिला आहे. त्यामुळे बेळगावसह कर्नाटकातील कानडी मुखंडांचा तिळपापड झाला आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी महाराष्ट्र व मराठी भाषिकांच्या नेत्यांबद्दल गरळ ओकण्यास सुरवात केली आहे.


Recent Comments