बेळगाव शहर आणि तालुक्याला मंगळवारी जोरदार अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे पार्क केलेली कार उडून गेल्याची घटना सांबरा विमानतळावर घडली.
होय आज, मंगळवारी दुपारी बेळगावातील सांबरा विमानतळावर वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसावेळी तेथे उभी केलेली एक कार उडून गेल्याची विस्मयकारक घटना घडली. पावसाच्या आगमनासोबतच जोरदार वारे वाहू लागल्याने विमानतळासमोर उभी केलेली जिप्सी कार उडून गेली. वाऱ्याच्या वेगामुळे कार थांबवलेल्या ठिकाणाहून पुढे सरकत असल्याचे पाहून कर्मचारीही चकित झाले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान विमानतळाच्या पार्किंग एरियात लावलेल्या वाहनांवर झाड कोसळल्याने काही वाहनांचे नुकसानही झाले आहे.


Recent Comments