Accident

खानापुरात दुचाकीची दुभाजकाला धडक : एकजण गंभीर जखमी

Share

बाइकस्वाराचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरील दुभाजकाला धडक बसून अपघात झाला आहे. सदर अपघात खानापूर परिसरात घडला आहे. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे.

खानापूर परिसरात झालेल्या या अपघातातील जखमीला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खानापूरहून नंदगडला दोन युवक दुचाकीवरून जात असताना अचानक वाहनावरील ताबा सुटल्याने दुचाकी दुभाजकाला आदळून हा अपघात घडला आहे. अपघातातील जखमी युवक विजेच्या खांब्याला आपटल्याने त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. अपघातस्थळी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे संतोष दरेकर, अवधूत तुडवेकर यांनी धाव घेऊन जखमीला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर रुग्णवाहिकेला पाचारण करून जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. खानापूर तालुक्यातील मुंतुर्गा या गावातील गजानन कल्लाप्पा देवकरी असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. सदर प्रकरण खानापूर पोलीस स्थानकात दाखल करण्यात आले आहे.

Tags: