बेळगावात शिवसेनेच्या वतीने आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

बेळगावातील श्यामाप्रसाद मुखर्जी रस्त्यावरील छत्रपती शिवाजी उद्यानात बेळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे सोमवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात भक्तिभावाने साजरी करण्यात आली. प्रारंभी प्रेरणा मंत्र म्हणून शिवपुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी शिवसेना संघटक तानाजी पावले, उप जिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर यांच्याहस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवसैनिक व शिवप्रेमींनी छत्रपती शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. शिवपुजनानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी राजू तुडयेकर, प्रवीण तेजम, प्रकाश राऊत, राजकुमार बोकडे, प्रदीप सुतार, प्रकाश हेब्बाजी, निलेश इंगळे, सन्नी रेमाण्णाचे, आनंद जायाण्णाचे, गौरांग गेंजी दांपत्य, विशाल कंग्राळकर, बाळासाहेब दंडगले, राजू कणेरी यांच्यासह शिवसैनिक, शिवप्रेमी उपस्थित होते.


Recent Comments