खानापूरचे तहसीलदार प्रवीण जैन यांचे ‘तहसीलदारांचे पाऊल गावाकडे‘ या मोहिमेंतर्गत गोल्याळी येथे ग्रामवास्तव्यासाठी आगमन झाले. यावेळी ग्रामस्थांनी त्यांची बेलगाडीतून मिरवणूक काढून भव्य स्वागत केले.

होय, राज्य सरकारच्या आदेशानुसार, वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी ग्रामवास्तव्य करण्याची मोहीम राज्यात सुरू आहे. स्थानिक समस्या स्थानिक पातळीवर जाऊन समजावून घेऊन सोडविणे हा यामागचा उद्देश आहे. या मोहिमेंतर्गत तहसीलदार प्रवीण जैन यांनी गोल्याळी गावात ग्रामवास्तव्य करण्याचे ठरविले. यासाठी गावात त्यांचे आगमन होताच ग्रामस्थांनी त्यांचे भव्य स्वागत केले. सरकारी शाळेपासून कार्यक्र्मस्थळापर्यंत त्यांची बैलगाडीतून वाजतगाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बिडी ग्रापं अध्यक्षा शांत यांच्यासह मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन केले.
यावेळी ग्रामस्थांना संबोधित करताना तहसीलदार प्रवीण जैन म्हणाले, ‘जिल्हाधिकाऱ्यांचे पाऊल गावाकडे’ हा सरकारचा अनोखा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात तालुकास्तरीय अधिकारी गावात येतात. त्यांच्याकडे ग्रामस्थांनी समस्या मांडल्यावर त्यांचे निराकरण जागीच करण्यात येते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आरोग्य खात्याच्या आयुष्मान भारत कार्ड, आधारकार्डाशी संबंधित समस्या असतील तर त्या गावपातळीवरच सोडविण्याची सोयही उपलब्ध केली आहे. त्याचा सदुपयोग ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहन जैन यांनी केले. 
यावेळी गोल्याळी ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याची खराब रस्त्यांची आणि गटारींची समस्या मंडळी. त्याशिवाय गावाला पुरेशी बसव्यवस्था करण्याची मागणी केली. नरेगा योजनेतून या समस्या सोडविण्याचे आश्वासन तालुका कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी उपस्थित असलेल्या परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना बससमस्या सोडविण्याची सूचना त्यांनी केली. गावातील तलावाचे पुनर्भरण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. त्यावर लघु पाटबंधारे खात्याच्या सहायक कार्यकारी अभियंत्यांना पत्र लिहून हे काम करण्याची सूचना करण्यात येईल असे आश्वासन तहसीलदारानी दिले. होशेट्टी मजरे गावाला स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याची मागणी त्या गावच्या ग्रामस्थांनी केली. त्यावर उपलब्ध सरकारी जमीन देऊन ही समस्या सोडविण्यात येईल असे तहसीलदार जैन यांनी सांगितले. या कार्यक्रमात विविध खात्यांशी संबंधित एकूण 118 अर्ज, निवेदने तहसीलदारांनी स्वीकारली. विशिष्ट कालमर्यादेत त्यावर कार्यवाही करण्यात येईल असे तहसीलदार जैन यांनी सांगितले.
यावेळी ग्रापं अध्यक्ष-उपाध्यक्ष, सदस्य, महसूल, पंचायत राज, शिक्षण, वन, आरोग्य, पोलीस तसेच विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments