Belagavi

अनियंत्रित मालवाहुने दिली धडक; वॉकिंग करणारा इसमाची जागीच ठार

Share

सकाळी वाकिंगला गेलेल्याला पाठीमागून अनियंत्रित मालवाहू ट्रकने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला तर या घटनेत रस्त्याशेजारी झाड देखील उखडून पडल्याची घटना जुना बी रोड अर्थात बी-एस येडुरप्पा मार्ग बळळारी नाल्या जवळ घडली आहे .
रविवारी सकाळी सहाच्या दरम्यान हा अपघात झाला असून यात प्रताप लक्ष्मण सालगुडे वय 49 वर्ष राहणार जुने बेळगाव यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला . मिळालेल्या माहितीनुसार प्रताप हे नेहमीप्रमाणे जुने बेळगाव पासून अलारवाड क्रॉस पर्यंत वाकिंगला गेले होते. या वेळी पाठीमागून नियंत्रण सुटलेल्या ट्रक ने त्यांना जोराची धडक दिली या घटनेत त्यांच्या डोक्याला जोराची धडक बसल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनास्थळी रहदारी दक्षिण पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.

Tags: