Vijayapura

शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत उसाचा संपूर्ण फड भस्मसात

Share

शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत उसाचा संपूर्ण फड भस्मसात झाल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील देवरहिप्परगी तालुक्यातील आलगूर येथे घडली.

होय, विजापूर जिल्ह्यातील देवरहिप्परगी तालुक्यातील आलगूर गावातील 4 शेतकऱ्यांच्या 19 एकरातील उसाच्या फडाला शॉर्टसर्किटने आग लागली. या दुर्घटनेत संपूर्ण 19 एकरातील उसाचा फड आगीच्या भक्षस्थानी पडला. आलगूरमधील अहमद पाशा नायकोडी, लालसाब नायकोडी, दावलसाब नायकवडी आणि अक्सर नायकोडी यांच्या मालकीचा हा ऊस होता. कष्टाने पिकवलेला ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने हातात आलेला घास तोंडात आला नाही अशी परिस्थिती या शेतकऱ्यांची झाली आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी प्रयत्नपूर्वक आगीवर नियंत्रण मिळवले. या प्रकरणी कलकेरी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

Tags: