खानापुरातील तालुका सरकारी इस्पितळात 12 ते 15 वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. पालकांनी आपल्या मुलांना त्याचा लाभ मिळवून द्यावा असे आवाहन खानापूर तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजय नांद्रे यांनी केले.

होय, खानापूर तालुका सरकारी इस्पितळात 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांच्या कोर्बोवॅक्स लसीकरण मोहिमेचे डॉ. नांद्रे यांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले. फ्लो
यावेळी बोलताना खानापूर तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजय नांद्रे म्हणाले, खानापूर तालुका सरकारी इस्पितळात 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक कोर्बोवॅक्स लस देण्यात येत आहे. त्याशिवाय तालुक्यातील नंदगड, इटगी आणि बिडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथेही ही लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पालकांनी आपापल्या मुलांना ही लस देऊन त्यांच्यात कोरोना प्रतिकारक शक्ती निर्माण करण्यास सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. बाईट
एकंदर सर्वच पालकांनी आपापल्या 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक कोर्बोवॅक्स लस द्यावी असे आवाहन तालुका आरोग्याधिकाऱ्यानी यावेळी केले.
यावेळी सुरेश राव, डॉ. तबस्सुम बानू, डॉ. शिवानंद किनगी, रविराज पै, शालिनी बेकण्णावर, नागरत्ना बागेवाडी, महानंद पारिशवाड, ललित गडकर आदी उपस्थित होते.


Recent Comments