Vijayapura

आरोग्य, अधिकारापेक्षा जनसेवा महत्वाची : डॉ. गोपाल कारजोळ

Share

हायकमांडने पुन्हा उमेदवारी दिल्यास आपण नागठाण मतदार संघातून पुन्हा निवडणूक लढवेन अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री गोविंद कारजोळ यांचे सुपुत्र डॉ. गोपाल कारजोळ यांनी व्यक्त केले.

विजापूरमध्ये त्यांनी हि प्रतिक्रिया नोंदविली आहे. मागील वेळी नागठाण मतदार संघात कमी मते मिळाल्यामुळे आपण पराभूत झाली. मात्र हायकमांडने पुन्हा एकदा संधी दिल्यास आपण पुन्हा एकदा निवडणूक लढविण्यास तयार असून मतदारसंघाच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे मत गोपाळ कारजोळ यांनी मांडले.

निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर तब्बल दोन वर्षांनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. केवळ जनतेच्या आशीर्वादाने आपण कोविड मधून बरे झालो आहोत असे गोपाल कारजोळ म्हणाले. २०२० साली कोविड मुळे तब्येत अत्यंत खालावली होती. यानंतर जनसंपर्कापासून अलिप्त राहिलेल्या गोपाल कारजोळ यांनी पत्रकार परिषद घेतली. आपण जीवन मरणाच्या दारात उभे होती. देवाची कृपा, मोठ्यांचे आशीर्वाद आणि जनतेचे प्रेम यामुळे आपला पुनर्जन्म झाला. नागठाण मतदार संघात पराभव होऊन देखील येथील जनतेने आपल्याला दिलेले प्रेम हे विशेष असल्याचे ते म्हणाले. ३६ दिवसांहून अधिक काळ आपली स्मरणशक्ती योग्य स्थितीत नव्हती. दरम्यान आपल्यावर शस्त्रक्रिया झाली. आणि केवळ सर्वांच्या आशीर्वादाने आणि डॉक्टरांच्या अथक परिश्रमाने आपण बरे झालो आहोत, असे गोपाल कारजोळ म्हणाले.

Tags: