वर्षातील शेवटचा सण म्हणजे होळी पौर्णिमा. या होळीपौर्णिमेच्या निमित्ताने श्रीशैल पालखी मिरवणुकीसाठी पदयात्रेचे आयोजन करण्यात येते. आंध्रप्रदेशमधील श्रीशैल मल्लिकार्जुन दर्शनासाठी विजापूरमधील भाविक पदयात्रेमार्फत रवाना होतात. होळी पौर्णिमेपासून सुरु होणाऱ्या पदयात्रेचा गुढी पाडव्यादिवशी समारोप होतो.
व्हॉइस : पंचपीठ म्हणून ख्याती असलेल्या आंध्रप्रदेश येथील श्रीशैल देवस्थानाच्या पालखीसाठी विजापूरमधील भाविक पदयात्रेच्या माध्यमातून रवाना होतात. पंधरा दिवसांचा प्रवास पायी करत श्रीशैल पालखी महोत्सवात सहभाग घेतात. विजापूर शहरातील श्री मल्लिकार्जुन सेवा समिती यांच्यातर्फे पदयात्रेत भाविकांसाठी संपूर्ण व्यवस्था करण्यात येते. पाणी, अन्न, राहण्याची व्यवस्था करण्यात येते. या पालखी महोत्सवात कर्नाटकातील लाखो भाविक सहभागी होतात.

पदयात्रेच्या माध्यमातून येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी अनेकजण दक्षता घेतात. भक्तांची सेवा करतात. भक्तांना लागणारे सर्व सहायय देखील करतात. पंधरा दिवस सुरु राहणाऱ्या या पालखी महोत्सवानंतर श्रीशैल येथील पाताळगंगा येथे स्नान आटोपून पदयात्रेचा समारोप करतात. पालखीमहोत्सवात करण्यात येणारी श्रीशैलांची आरास हि अप्रतिम असते.
होळी पौर्णिमेनंतर आणि होलिका दहन केल्यानंतर श्रीशैल पालखी महोत्सवात भाविक सहभागी होतात. गुढीपाडव्याच्या तिसऱ्या दिवशी मोठ्या उत्साहात पालखीची विशेष पूजा केली जाते. शिवाय पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या भाविकांतर्फे घरोघरीदेखील विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.


Recent Comments