Belagavi

बेळगावात मुस्लिम व्यावसायिकांचा बंद

Share

 हिजाब प्रकरणी हायकोर्टाने दिलेल्या निकालाच्या विरोधात बेळगावात मुस्लिम व्यावसायिकांनी बंद पाळून मूक निदर्शने केली

कटिगेरी टिपू सुलतान समितीच्या आवाहनानुसार बेळगावात आज काही ठिकाणी मुस्लिम व्यावसायिकांनी बंद पाळला. हिजाबप्रकरणी कर्नाटक हायकोर्टाने दिलेला निकाल अमान्य करत त्याच्या निषेधार्थ मूक निदर्शने करण्यात आली. शहरातील फोर्ट रोड, खडेबाजार, भेंडीबाजार, आझम नगर, वीरभद्र नगर, उज्ज्वल नगर, गांधी नगर, आझाद नगरसह अनेक ठिकाणी मुस्लिम व्यावसायिकांनी व्यापार-उदीम बंद ठेवून निषेध व्यक्त केला.

या संदर्भात माहिती देताना कटिगेरी टिपू सुलतान समितीचे पदाधिकारी सय्यद अरिफ म्हणाले, हिजाबप्रकरणी हायकोर्टाने दिलेला निकाल आम्हाला अमान्य आहे. त्यामुळे या निकालाच्या विरोधात मुस्लिम व्यावसायिकांनी स्वयंप्रेरणेने व्यापार-उदीम बंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे. मूक निदर्शने करून या निकालाचा निषेध केला आहे.

दरम्यान बेळगावात मोजका अपवाद वगळता या बंदला फारसा प्रतिसाद लाभला नाही. होळी व रंगपंचमी सणाची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत नागरिकांनी गर्दी केली होती.

 

 

 

Tags: