बेळगावमधील पृथ्वी फाउंडेशन यांच्यावतीने जानपद कार्यक्रम तसेच पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता.
बेळगावमधील कन्नड साहित्य भवन येथे पृथ्वी फाउंडेशनच्या वतीने जानपद आणि पारितोषिक वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांनी वृक्षांना पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात केली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहून एम्ह्णून साहित्यिका डॉ. पी जी केम्पन्नवर या उपस्थित होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, जानपद साहित्य, लोकसाहित्य हि साहित्याची प्रेरणा आहे. साहित्यिकांची प्रेरणा आहे. यातून साहित्याचे महत्व समजते. पृथ्वी फाउंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम हा कौतुकास्पद असल्याचे त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पृथ्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. हेमावती सोनोळ्ळी या होत्या. आईचे महत्व सांगणाऱ्या जानपद गीताचे त्यांनी सादरीकरण केले. जानपद गीतांमधून नीतिमत्ता समजते. जानपद गीतांमधून देण्यात येणारा संदेश प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगिकारल्यास आपले जीवन सार्थकी लागेल, असे त्या म्हणाल्या.
यावेळी विविध जानपद गीते, जानपद कलेवर आधारित विविध संस्कृती कार्यक्रम सादर करण्यात आले. याचप्रमाणे पुष्कल नृत्यालयाच्यावतीने नृत्य कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सेवा रत्न पुरस्काराने विद्या हुंडेकर यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी साहित्यिका आशा यमकनमर्डी पृथ्वी फाउंडेशनच्या सचिव शैलजा हिरेमठ, उपाध्यक्षा महादेवी हिरेमठ, सहसचिव रश्मी पाटील, कोषाध्यक्षा भुवनेश्वरी पुजेरी, सदस्या पार्वती पाटील, गिरीजा हट्टीहोळी आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments