Hukkeri

पारंपारिक पोशाख संस्कृतीचे प्रतीक : महावीर निलजगी

Share

हुक्केरी शहरातील महावीर शिक्षण संस्थेत पारंपरिक वेशभुषा आणि क्रीडा स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत एस एस एल सी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभुषा साकारली होती.

या समारंभाचे उद्घाटन महावीर उद्योग समूहाचे अध्यक्ष महावीर निलजगी यांच्याहस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर बोलताना महावीर निलजगी म्हणाले, पारंपरिक पोशाख हे आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे. या माध्यमातून भाषा आणि संस्कृतीचे जतन होते असे निलजगी म्हणाले.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक कलेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले.

यावेळी नगरपालिका अध्यक्ष ए के पाटील, रोहित चौगुला, बाहुबली सोलापूर, संजय निलजगी, प्रज्वल निलजगी, निवृत्त प्राचार्य पी जी कोण्णूर, रिडस संस्थेचे अध्यक्ष अशोक पाटील, बाबू सुंकडं, संजीव मुतालिक तसेच महावीर शिक्षण संस्थेचे शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: