हुक्केरी शहरातील पोलीस स्थानकात होळीच्या पार्श्वभूमीवर पूर्वखबरदारीसाठी नियोजनपर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस विविध समाजाचे नेते उपस्थित होते.

या बैठकीत बोलताना हुक्केरी पोलीस निरीक्षक रफिक तहसीलदार यांनी बोलताना सांगितले, शुक्रवार दि. १८ मार्च रोजी सकाळी होळी आणि २० मार्च रोजी रंगपंचमी सणाचे आचरण करायचे आहे. यादरम्यान जनतेने शांतता आणि एकोप्याने हा सण साजरा करायचा आहे. रविवारी मोरारजी देसाई वस्तीशाळेत प्रवेश परीक्षा असून या परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची समस्या, अडचण निर्माण होऊ नये याचे भान प्रत्येकाने ठेवावे.
या बैठकीला नगरपालिका अध्यक्ष ए के पाटील, माजी अध्यक्ष जयगौडा पाटील, मोमीनदादा उदय हुक्केरी आणि इतर नेते उपस्थित होते.


Recent Comments