विजापूरमध्ये अनेक प्रकारच्या संस्कृतींचे जतन केले जाते. याच अनुषंगाने येथील होळी पॊर्णिमा देखील विशिष्ट प्रकारे साजरी केली जाते. होळी पौर्णिमेच्या निमित्ताने या भागातील जनतेच्यावतीने रेणुका देवीच्या पडल्या भरण्याचा कार्यक्रम पार पाडला जातो.

विशेषतः होळी पौर्णिमेच्या निमित्ताने होलिकाचे दहन करण्यात येते.चैत्र महिन्यापासून सुरु होणाऱ्या हिंदू वर्षाची पूर्व तयारी म्हणून देखील होळी पौर्णिमा साजरी केली जाते. मात्र वैविध्यपूर्ण संस्कृतीने नटलेल्या विजापूरमध्ये होळी पौर्णिमेच्या निमित्ताने श्री रेणुकादेवीचा पडली भरण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. उत्तर कर्नाटकासह संपूर्ण कर्नाटक आणि महाराष्ट्रातील भाविकांचे आराध्य दैवत असणाऱ्या सौंदत्ती रेणुका देवीची पडली भरण्याचा कार्यक्रम विजापूरमध्ये आयोजित करण्यात येतो.
होळी पौर्णिमेच्या निमित्ताने वैशिट्यपूर्ण अशा पडली भरण्याच्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात भाविक जमा होतात. घरोघरी पडली भरण्याचा कार्यक्रम पार पाडला जातो. होळी पौर्णिमेच्या आधीच प्रत्येक घरोघरी साफसफाईची कामे केली जातात. विविध प्रकारच्या अन्नपदार्थांचा नैवेद्य होळी पौर्णिमेच्या निमित्ताने देवीला दाखविण्यात येतो.इतकेच नाही तर विविध प्रकारच्या भाज्यांनी आरती केली जाते. यावेळी आयोजित करण्यात येणारा कार्यक्रम हा पाहण्याजोगा असतो.
होळी पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पडली कार्यक्रमावेळी जोगम्माला आवाहन करण्यात येते. जोगम्माच्या आशीर्वादाने पुढील कार्यक्रम पार पाडण्यात येतो. होळी पौर्णिमेच्या निमित्ताने होणारा हा कार्यक्रम विजापूरमध्ये पिढ्यानपिढ्या परंपरेनुसार सुरु आहे.


Recent Comments