Hukkeri

हुक्केरीत मुस्लिम व्यावसायिकांचा स्वयंघोषित बंद

Share

 शाळामहाविद्यालयात हिजाब घालण्यास बंदी घालणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निकालाच्या निषेधार्थ हुक्केरीत आज मुस्लिम व्यावसायिकांनी स्वयंघोषित बंद पाळला

हिजाबप्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा हुक्केरीतील मुस्लिम व्यावसायिकांनी आज व्यापार बंद ठेवून मूक पद्धतीने निषेध केला. हुक्केरीत ऑटो मोबाईल आणि कपडे व अन्य साहित्य विक्रीच्या  व्यवसायात मुस्लिम व्यापारी अधिक प्रमाणात आहेत. त्यांनी आज बंद पाळला. बंदमुळे काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हुक्केरी पीएसआय रफिक तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

 

 

 

Tags: