Belagavi

बेळगावात पहिल्याच दिवशी ‘जेम्स’ला उदंड प्रतिसाद 

Share

प्रसिद्ध कन्नड चित्रपट अभिनेते पुनीत राजकुमार यांचा आज जन्मदिन. त्यानिमित्त राज्यभरात त्यांचाजेम्सचित्रपट आज प्रदर्शित झाला. बेळगावात चित्रा थिएटरमध्ये हा चित्रपट रिलीज झाल्याने या थिएटरला एखाद्या लग्नघराप्रमाणे फुलांच्या माळांनी सजविण्यात आले होते. याबाबत हा खास रिपोर्ट

कन्नडचे पॉवर स्टार पुनीत राजकुमार यांच्या जन्मदिनानिमित्त गुरुवारी त्यांच्या चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले. या आनंदाला अप्पू आपल्यात नसल्याच्या दुःखाची किनार असली तरी चाहत्यांनी लाडक्या अभिनेत्याचा जन्मदिन उत्साहात साजरा केला. पुनीत यांनी अखेरचा अभिनय केलेला ‘जेम्स’ चित्रपट आज राज्यभरात प्रदर्शित झाला. त्यामुळे तर चाहत्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. बेळगावात चित्रा थिएटरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. \

त्यामुळे या थिएटरला एखाद्या लग्नघराप्रमाणे फुलांच्या माळांनी सजविण्यात आले होते. अप्पू यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून चाहत्यांनी आपली श्रद्धा व्यक्त केली. सकाळी 9 वाजता या चित्रपटाचा पहिला शो झाला. आपल्या लाडक्या अभिनेत्याचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी त्याआधीपासूनच चित्रा थिएटरमध्ये गर्दी केली होती. त्यामुळे चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊसफुल्ल झाला. जेम्स चित्रपटाचे चित्र असलेली टी शर्ट घालून थिएटरमध्ये येऊन चाहत्यांनी श्रीफळ वाढवून पूजा केली. सकाळी 9 वाजताच पहिला शो आणि दुपारी 12 वाजताच्या मॅटिनी शोची सर्व तिकिटे पुनीत राजकुमार अभिमानी संघाने बुक केली होती.

 

 

 

 

Tags: