Chikkodi

दिवंगत पुनीत राजकुमार यांच्या जन्मदिनी रक्तदान शिबीर

Share

दिवंगत अभिनेते पुनीत राजकुमार यांच्या जन्मिदिनाचे औचित्य साधून आज चिकोडी येथील येडूर या गावात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

पुनीत राजकुमार यांच्या अभिनयक्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन त्यांनी दिलेल्या आदर्शांचे पालन करत आज त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून अनेक ठिकाणी समाजाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून चिकोडी येथील येडूर या गावात श्री साई रुग्णालयात पुनीत राजकुमार यांच्या चाहत्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिरात १०० हुन अधिक चाहत्यांनी स्वयंप्रेरणेने सहभाग घेत रक्तदान केले.

यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना सचिन पाटील आणि डॉ. जिनेंद्र उगारे यांनी सांगितले, पुनीत राजकुमार यांनी अभिनयासह अनेक क्षेत्रात आपले योगदान दिले आहे. समाजासाठी अनेक उपक्रम राबवत त्यांनी योगदान दिले आहे. त्यांच्याप्रमाणे आपल्याला सामाजिक कार्य करणे जमणार नाही मात्र त्यांनी दिलेल्या आदर्शानुसार आपण प्रयत्न करत असून त्यांच्या जन्मदिनी आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरात अनेकांनी उत्स्फूर्तपणे आणि स्वयंप्रेरणेने सहभाग घेतल्याचे त्यांनी सांगितले.

पुनीत राजकुमार यांच्या कटआउटला पुष्पहार अर्पण करून चाहत्यांनी आदरांजली वाहिली. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून देखील पुनीत राजकुमार यांच्या तत्वांचे पालन करत अनेक चाहते स्वयंप्रेरणेने या रक्तदान शिबिरात सामील झाले होते.

Tags: