Belagavi

गुंजेनहट्टी श्रीहोळी कामाण्णाची उद्या यात्रा

Share

 बेळगाव जिल्ह्यासह संपुर्ण कर्नाटक, महाराष्ट्र गोवा राज्यातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आणी नवसाला पावणारी अशी ख्याती असणाऱ्या कडोली ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या गुंजेनहट्टी गावच्या श्रीहोळी कामाण्णाची यात्रा उद्या, शुक्रवार दि.१८ मार्चला आहे असे यात्रा कमिटीने कळविले आहे.

सकाळी ९ वा. मुर्ति प्रतिष्ठापना, अभिषेक, विधिवत पूजन आणि होळी दहनाने मुख्य यात्रेला सुरुवात होणार आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे यात्रा साधेपणाने झाली होती. आता  कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असुन शासनाने नियमही शिथील केल्याने भाविकांची संख्या अधिक असण्याची शक्यता असल्याने तयारीही जोरात सुरु आहे. मंदिर परिसर आणी संपुर्ण गावची स्वच्छता केली असुन कमानीपासुन ते मंदिरापर्यंत भलामोठा मंडप उभारला असुन मंदिराला आकर्षक रंगरंगोटी व विद्युत अलंकार केला आहे.

गर्दी-गोंधळ होऊ नये म्हणून दर्शनाला जाण्यासाठी व परतण्यासाठी वेगळे मार्ग केले आहेत. गौरीनाल्याच्या पुलाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यामुळे भाविकांना त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेळगाव भागातून येणारी वाहने कडोलीच्या अंबराईतच पार्क करावीत रस्त्याची अडचण असल्याने वाहने मध्येच अडकुन पुढे नेता आणि मागेही आणता येत नाहीत. तर गुंजेनहट्टी देवगिरीच्या भागातुन येणारी वाहने यशोधन मंगल कार्यालयाजवळ तर मन्नीकेरी गुंजेनहट्टी भागातुन येणारी वाहने मारुती मंदीरजवळ आणि कडोली अगसगे भागातुन येणारी वाहनेही कडोलीच्या अंबराईतच थांबवायची असल्याचे यात्रा कमिटीतर्फे कळविण्यात आले आहे.

 

 

Tags: