Belagavi

हिजाब संदर्भातील निकालाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक बंदची हाक कर्नाटक बंदला बेळगाव इस्लाम संघटनेचा पाठिंबा स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्याचे आवाहन

Share

हिजाब प्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर कर्नाटक बंदची हाक काही मुस्लिम संघटनांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावमधील मुस्लिम समाजाच्या वतीने अंजुमन संस्था आणि उलेमा या संघटनांनी उद्या सर्व व्यवहार बंद करून कर्नाटक बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.

आज बेळगावमधील अंजुमन इस्लाम संस्थेच्या सभागृहात हिजाब प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निकालासंदर्भबात चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अंजुमन संस्थेचे अध्यक्ष आसिफ राजू सेठ यांच्या नेतृत्वाखाली हि बैठक बोलाविण्यात आली होती.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना उफती आजीद खाजी म्हणाले, गुरुवार दिनांक १७ मार्च रोजी पुकारण्यात आलेला बंद हा उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात पुकारण्यात आला आहे. या बंदला सर्व मुस्लिम समाजातील बांधवांनी पाठिंबा देऊन सर्व व्यवहार बंद ठेवावेत, असे आवाहन त्यांनी केले.

अंजुमन संस्थेचे अध्यक्ष आसिफ राजू सेठ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले कि, उद्याच्या बंद सर्वांनी यशस्वी करावा. शहरात कोणत्याही पद्धतीची मिरवणूक काढण्यात येणार नाही. किंवा निवेदन देखील देण्यात येणार नाही. बंद स्वयंस्फूर्तीने यशस्वी करायचा असून कोणीही यासाठी दबाव निर्माण करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

उच्च न्यायालयाने दिलेल्या हिजाब प्रकरणाच्या निकालानंतर मुस्लिम समाजात नाराजी व्यक्त होत आहे. उच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुस्लिम समाज सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या निकालावर नाराजी व्यक्त करण्यासाठी गुरुवारी कर्नाटक बंदची हाक देण्यात आली आहे. हा बंद कितपत यशस्वी होतो आणि या बंद च्या माध्यमातून काय साध्य होते हे पाहावे लागेल.

Tags: