राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत घवघवीत यश मिळविलेल्या जलतरणपटू साहिल काजूकर याचा विमल फाउंडेशन या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष किरण जाधव यांनी सन्मान केला.
साहिल काजूकर याने नुकत्याच झालेल्या कर्नाटक स्टेट लेवल पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप या जलतरण स्पर्धेत 1 सुवर्ण आणि 2 रौप्यपदके पटकावून बेळगावचा लौकिक वाढविला आहे.

पॅरा जलतरणपटू साहिल याची 23 मार्च रोजी राजस्थान येथे होणाऱ्या राष्ट्रस्तरीय पॅरा जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत असून किरण जाधव यांनी त्याचा सन्मान करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.


Recent Comments