Belagavi

खानापूरमध्ये मुलींसाठी होस्टेलची मागणी सभागृहात अंजली निंबाळकरांनी मांडला मुद्दा

Share

सभागृहात सुरु असलेल्या अधिवेशनात विधानसभा उपसभापती आनंद मामनी यांनी रस्त्यांच्या नूतनीकरणाचा आणि खानापूर मतदार संघाच्या आमदार अंजली निंबाळकर यांनी खानापूरमध्ये मुलींसाठी हॉस्टेल बांधण्यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला.

बुधवारी विधानसभा अधिवेशनाचे कामकाज सुरु असताना सौंदत्ती आमदार आणि विधानसभा उपसभापती आनंद मामनी यांनी रस्त्यांच्या नूतनीकरणाचा मुद्दा उपस्थित केला. २००८ ते २०१३ पर्यंत आपल्या सरकारच्या कालावधीत आपल्या गावात रस्ते निर्माण केल्याचे सांगितले. हे रस्ते कालबाह्य आहेत. यामुळे या रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी अनुदान मंजूर करण्याची विनंती त्यांनी केली. या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री के एस ईश्वरप्पा म्हणाले, मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत यावेळी २१८ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. जिल्हा पंचायतींमार्फत २४२ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. हि रक्कम रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती ईश्वरप्पा यांनी दिली.

याचप्रमाणे खानापूर मतदार संघाच्या आमदार अंजली निंबाळकरांनी खानापूरमध्ये मुलींसाठी हॉस्टेल निर्माण करण्याचा मुद्दा उपस्थित केला. खानापूर तालुक्यात एकमेव हॉस्टेल आहे. तेही भाडेतत्वार आहे. केवळ १०० विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या या हॉस्टेलमध्ये इतर विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून २०० विद्यार्थ्यी क्षमतेचे नवे वसतिगृह निर्माण करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. यासंदर्भात कोटा श्रीनिवास पुजारी यांनी प्रतिक्रिया देताना आगामी आर्थिक वर्षात नव्या वसतिगृहाच्या निर्मितीसाठी विचार करण्याचे आश्वासन दिले.

अंजली निंबाळकर यांनी उपस्थित केलेल्या होस्टेलच्या मुद्द्यावर मुलांसहित मुलींसाठी एकूण ८ होस्टेलसंदर्भात आपण विचार करण्यात असल्याची प्रतिक्रिया मंत्र्यांनी दिली. खानापूर तालुक्यात एकमेव मॅट्रीकपूर्व हॉस्टेल असून आपल्या तालुक्यात मोठे हॉस्टेल निर्माण करण्यात यावे, असा आग्रह मंत्र्यांनी केला. या मुद्द्यावर प्रत्त्युत्तर देताना कोटा श्रीनिवास पुजारी यांनी आगामी आर्थिक वर्षात या मागणीचा विचार करून मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

Tags: