रामेश्वरमला जाणारी क्रुझर उलटून 5 भाविक जागीच ठार झाले. ही दुर्घटना विजापूर जिल्ह्यातील कुडलगी तालुक्यातील बनवीकल्लू गावाजवळ होस्पेट–चित्रदुर्ग राष्ट्रीय महामार्ग क्र. ५० वर बुधवारी पहाटे २ च्या सुमारास घडली.
होय, रामेश्वरमला देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचे क्रुझर वाहन उलटून झालेल्या भीषण दुर्घटनेत 5 भाविकांना जीव गमवावा लागला. विजापूर जिल्ह्यातील निडगुंदी गावचे हे भाविक तमिळनाडूमधील रामेश्वरमला चालले होते. चालक क्रीझर भरधाव वेगाने चालवीत होता. त्यामुळे बनवीकल्लू गावाजवळ महामार्गावर त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटून क्रूझरने महामार्गावरील दुभाजकाला जोरदार धडक दिली. त्यानंतर क्रुझर रस्त्याच्या बाजूला उलटली.
या अपघातात निडगुंदी येथील सिद्द्य्या काळगी, कल्लप्पा, लक्ष्मीबाई, कीरशहाळ गावची कंतव्वा, अलमट्टी गावची नीलम्मा हे भाविक जागीच ठार झाले. बसवण बागेवाडी येथील बसय्या, निडगुंदीचे निर्मला, भीमशेप्पा, अनुसया, कीरशहाळचे रेणुका, सुमंगला, महानंदेप्पा सिदनाळ, तिम्मप्पा, अब्याल शंकरेम्मा हे भाविक गंभीर जखमी झाले आहेत. होसहळ्ळी पोलीस ठाण्यात या दुर्घटनेची नोंद झाली आहे. कुडलगीचे डीवायएसपी जी. हरीश रेड्डी, सीपीआय कोट्टुर, पीएसआय तसेच हायवे पेट्रोल पोलिसांनी भेट देऊन बचावकार्य सुरु केले.
Recent Comments