Belagavi

रेणुकाचार्य जयंतीनिमित्त बेळगावात भव्य मिरवणूक

Share

बेळगावात बुधवारी अर्चक आणि पुरोहित संघातर्फे श्री रेणुकाचार्य जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली.

होय, बेळगाव शहरात बुधवारी राज्य अर्चक संघाच्या बेळगाव शाखेतर्फे आणि पुरोहित संघातर्फे श्री रेणुकाचार्य जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. रेणुकाचार्य यांचे भव्य छायाचित्र असलेले वाहन मिरवणुकीच्या अग्रभागी होते. अनेक युवा दुचाकीस्वार घोषणा देत या मिरवणुकीत सहभागी झाले होते. शहरातील चन्नम्मा चौकातून विविध मार्गांवर ही मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना तारिहाळचे अडवीश्वर देवरु स्वामीजी म्हणाले, बेळगावात आज अर्चक आणि पुरोहित संघातर्फे श्री रेणुकाचार्य जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे. यात अनेक मान्यवर सहभागी झाले आहेत. आम्ही सारे एक आहोत, तिरंगा राष्ट्रध्वजाखाली एकाच देशाचे नागरिक आहोत ही भावना वाढीस लागावी या हेतून या मिरवणुकीचे आयोजन केले आहे.

यावेळी अर्चक आणि पुरोहित संघाचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Tags: