Belagavi

हायकोर्टाच्या निकालानंतर तरी काँग्रेसला सद्बुद्धी मिळू देत : आ. अभय पाटील

Share

कायदा काय आहे हे माहित असूनही काँग्रेसने हिजाबची बाजू घेत राज्यात अशांतता निर्माण केली. आता हायकोर्टाच्या निकालानंतर तरी काँग्रेसला सद्बुद्धी मिळू देत अशी देवाकडे प्रार्थना करू असे बेळगाव दक्षिणचे . अभय पाटील यांनी सांगितले

हिजाब वादावर हायकोर्टाने दिलेल्या निकालावर बेळगावात पत्रकारांशी बोलताना आ. अभय पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, एसएफआयसह काही विध्यार्थी संघटनांसह काँग्रेसने हातमिळवणी केली आहे. पण हायकोर्टाच्या निकालाने काँग्रेससह सगळ्यांना थेट संदेश मिळाला आहे. एका समाजाची तळी उचलत त्यात विष कालवण्याला कोर्टाच्या या निकालाने रोखले आहे असे ते म्हणाले.

हिजाब वाद सुरु झाल्यापासून हिंदूंना, हिंदू संघटनांना लक्ष्य करण्यात येत होते. या सगळ्याला हायकोर्टानेच आता उत्तर दिले आहे. सरकार असो किंवा समाज हिजाबप्रकरणी हायकोर्टाने दिलेला आदेश सर्वानाच लागू आहे. काँग्रेसनेसुद्धा त्याचे पालन केले पाहिजे असे आ. अभय पाटील यांनी सांगितले.

एकंदर, हिजाबप्रकरणी हायकोर्टाने चांगला निर्णय दिला आहे असे सांगून आ. अभय पाटील यांनी निकालावर समाधान व्यक्त केले आहे.

 

 

 

Tags: